म्युच्युअल फंड
गेल्या काही लेखात आपण म्युच्युअल फंडबाबत सर्वसाधारण माहिती मिळविली आहे. या लेखात आपण महत्वाची माहिती घेणार आहोत ती म्हणजे गुंतवणुक उद्दिष्टानुसार योजना काय असतात.
म्युच्युअल फंड योजना या प्रामुख्याने खालीलप्रमाणे आहेत
शेअर्स निगडीत योजना (equity funds)
रोखे निगडीत योजना (debt funds)
रोखे व शेअर्स निगडीत योजना (hybrid funds)
आंतरराष्ट्रीय गुंतवणुक योजना (international, global funds)
इतर योजनांमध्ये गुंतवणुक (fund of fund)
शेअर्स निगडीत योजना (equity funds)- या योजनांमधील गुंतवणुक ही सर्व शेयर्स अथवा शेअर्स निगडीत माध्यमात केली जाते. भारतीय शेयर बाजारात हजारो कंपन्या गुंतवणुकीसाठी उपलब्ध आहेत. आपली पुंजी वाढविण्यासाठी शेयर हे खूप उपयुक्त साधन आहे. म्युच्युअल फंडादवारे आपण या साधनाचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग करू शकतो. हे फंड सर्वसाधारणपणे खालील प्रकारे विभागले जातात
मोठ्या कंपन्या (Large Cap) भारतातील मोठ्या १०० कंपन्या
मध्यम कंपन्या (Mid cap) १०० ते २५० कंपन्या
लहान कंपन्या (small cap) २५० पुढील सर्व कंपन्या
आपल्या गुंतवणुक उद्दिष्टानुसार योजना निवडून आपण आपले लक्ष्य गाठू शकतो.
येथे आपण एकरकमी अथवा आवर्ती (सिप) (recurring, systematic investment plan) पद्धतीने गुंतवणुक करू शकतो. येथे गुंतवणुक करताना एक लक्षात ठेवावे की शेयर हे माध्यम दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी आहे. सुरवतीच्या काळात पैसे थोडे वर - खाली
असु शकतात. पैसे कमी झाले म्हणून लागलीच काढून घेऊ नयेत. तसेच थोड्या अवधीत पैसे मिळतील म्हणून थोड्या अवधिकारता गुंतवून बघू असेही टाळावे.
सिप हा गुंतवणुकिचा असा सोपा मार्ग आहे की ज्याने आपण आपली अनेक दीर्घकालीन आर्थिक लक्ष्य सुलभपणे साध्य करू शकतो, जसे मुलांचे शिक्षण, विवाह अथवा स्वतःच्या निवृत्तीची (retirement) सोय वगैरे.
येथे असेही फंड आहेत की लहान,मध्यम अथवा मोठ्या कंपन्या या मध्ये सर्वत्र गुंतवणुक करतात (Multicap, Flexicap Funds).
येथे करबचत योजना (tax savings schemes) पण आहेत. या योजनांमध्ये देखील आपली पुंजी चांगली वाढू शकते.
आपल्याला एखादे क्षेत्र गुंतवणुकीसाठी चांगले वाटत असेल तर संबंधित क्षेत्रात गुंतवणुक करणारे फंडही येथे उपलब्ध आहेत. येथील गुंतवणुक जोखीम खूप जास्त आहे. येथे गुंतवणुक करताना आपला अभ्यास व तज्ञांचा सल्ला या दोन गोष्टींची गरज आवश्यक आहे. येथे योग्य वेळी गुंतवणुक करणे व अपेक्षित नफा झाल्यावर बाहेर पडणे महत्वाचे.
येथील गुंतवणुकीसाठीचे पर्याय खालीलप्रमाणे
लहान, मध्यम अथवा मोठ्या कंपन्या मध्ये गुंतवणुक असणारे फंड (Multicap, Flexicap Funds)
फक्त मोठ्या कंपन्या मध्ये गुंतवणुक असणारे फंड (Large Cap Funds)
मोठ्या व मध्यम कंपन्या मध्ये गुंतवणुक असणारे फंड (Large and Midcap Fund)
फक्त मध्यम कंपन्या मध्ये गुंतवणुक असणारे फंड (Midcap Funds)
फक्त लहान कंपन्या मध्ये गुंतवणुक असणारे फंड (small cap funds)
मोठा लाभांश देणाऱ्या कंपन्या मध्ये गुंतवणुक असणारे फंड (Dividend Yield Funds)
आर्थिक भक्कम असलेल्या कंपन्या मध्ये गुंतवणुक असणारे फंड (Value Fund)
बाजारातील प्रवाहाविरुद्ध गुंतवणुक असणारे फंड (Contra Funds)
ठराविक कंपन्यात गुंतवणुक करणारे फंड (जास्तीत जास्त ३० कंपन्या) (Focussed Funds)
ठराविक क्षेत्रात गुंतवणुक करणारे फंड (Sectoral, Thematic Funds)
करबचत योजना (elss, Tax savings schemes)
शेयर निगडीत योजना व सिप यांच्या मदतीनो आजच आपल्या आर्थिक लक्ष्याकडे वाटचाल सुरु करा.
सिप सुरु करण्यासाठी कोणताही मुहुर्ताची आवश्यकता नाही.
म्युचुअल फंडात केलेली गुंतवणूक हि बाजाराच्या अधीन असते, गुंतवणूक करण्यापूर्वी संबधित योजनेचे माहिती पत्रक वाचून व समजून घेऊन गुंतवणूक करा.
उद्यम,
उद्धव तुळशीबागवाले.
फोन: ८४४ ८४४ ०७३४, ०२०२४२२०७९९
Was this article helpful?
That’s Great!
Thank you for your feedback
Sorry! We couldn't be helpful
Thank you for your feedback
Feedback sent
We appreciate your effort and will try to fix the article