मिच्युअल फंड
आजच्या काळात पैसाचे म्हणजे खर्च व गुंतवणूक यांचे नियोजन करणे महत्वाचे आहे.
गुंतवणुकीची अनेक साधने आहेत. मिच्युअल फंड हे त्यापैकी एक.
इतर साधने जशी मुदत ठेव , विमा ही लोकांना माहिती आहेत.
मिच्युअल फंड हे फारसे माहीत नसलेले साधन.
मिच्युअल फंडा बाबत थोडी माहिती घेऊ.
मिच्युअल फंड ह्या सेबिनियंत्रित संस्था आहेत.
त्यांचे कार्य म्हणजे लोकांकडून पैसे गोळा करून बाजारामध्ये गुंतविणे.
सर्वसामान्य माणसाला बाजाराची नीट माहिती नसते. पूर्ण माहिती अभावी स्वतः बाजारात गुंतवणूक केल्याने नुकसान झाल्याची उदाहरणे जास्त आहेत.
मिच्युअल फंडाद्वारे ही जोखीम कमी होते.
अजुन एक गैरसमज म्हणजे मिच्युअल फंड फक्त शेअर्स मध्ये पैसे गुंतवतात.
मिच्युअल फंडांच्या अनेक योजना आहेत, ज्या वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करतात जसे की सरकारी रोखे, कंपनी ठेवी इत्यादि.
येथे जोखीम शेअर्स पेक्षा कमी असते.
थोडक्यात आपल्या गरजेनुसार योजना उपलब्ध आहेत.
मिच्युअल फंडांचा मोठा फायदा हा की आपली गुंतवणुक ही अनेक कंपन्यांमध्ये
गुंतविली जाते. ज्यामुळे आपली एका कंपनीतील गुंतवणुकीची जोखीम कमी होते. समजा एखाद्या कंपनीला काही अडचणीत आली तर आपल्या गुंतवणुकीतील काही टक्के कमी होऊ शकतात. आपली पूर्ण गुंतवणुक जर एखाद्या कंपनीत असेल व ती अडचणीत आली तर पूर्ण पैसे अडकण्याची शक्यता असते. थोडक्यात मुच्युअल फंडामधील गुंतवणुक कमी होण्याचा धोका असतो ना की पूर्ण पैसे बुडण्याचा.
मुच्युअल फंडामध्ये प्रत्येक योजनेत २ पर्याय असतात १)परतावा २) वृद्धी
पर्याय १ मधे लाभांश दिला जातो पर्याय क्रमांक २ मधे लाभांश न देता गुंतवणुकीची वाढ केली जाते.
तसेच येथे एकरकमी गुंतवणुक अथवा दरमहा गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध आहे.
थोडक्यात सांगायचे झाले तर मुच्युअल फंड हे गुंतवणुकीचे सुलभ साधन आहे. अर्थात येथे गुंतवणुक करताना गुंतवणुक तज्ञाची मदत जरूर घ्यावी, कारण आपल्या गुंतवणुक उद्दिष्ट पुर्ण करण्यासाठी कोणती योजना योग्य आहे ते जाणकारच सांगु शकतो.
आज अनेक योजना आकर्षक परताव्याचे आमिष दाखवतात, परंतु हे लक्षात घ्या की जास्त परतावा जास्त जोखीम. उदाहरण घ्यायचे झाले तर राष्ट्रियकृत बँकांचे ठेवीचे व्याजदर कमी असतात, तर कोऑपरेटीव बँकांचे व्याजदर थोडे जास्त असतात, पतपेढीचे अजून जास्त असतात. पण राष्ट्रियकृत बँक पैसे बुडविणार नाही. थोडक्यात सांगायचे तर परतव्याच्या मागे न लागता डोळसपणे गुंतवणुक करणे ही काळाची गरज आहे. मिच्युअल फंड परताव्याची हमी देत नाहीत, परंतु गुंतवणुक उद्दिष्टानुसार योग्य योजना निवडल्यास कधीच नुकसान होत नाही.
मिच्युअल फंडांचे सर्व व्यवहार हे चेकने बँकानमार्फत होत असल्याने फसवणुकीची शक्यता कमी होते. तसेच पैसे काढताना देखील बँक खात्यात जमा होतात, त्यामुळे पैसे परत मिळवायला देखील कोण्याच्या मागे लागावे लागत नाही.
पैसे काढणे घालणे हे व्यवहार सोपे व सुलभ असतात. आपण फोन, संगणक यांच्या माध्यमातून देखील व्यवहार करू शकता. कोणत्याही कार्यालयात जायची गरज नसते. फॉर्म भरून प्रक्रिया एकदा पूर्ण केली की परत कोठेही चकार मारायची गरज उरत नाही, अर्थात आपण ज्यांच्या मार्फत गुंतवणुक करता त्यांच्याशी नियमित संपर्क ठेवणे व त्यांच्या सल्ल्याने व्यवहार करणे आपल्याच हिताचे असते.
काळ बदलतो आहे जुन्या गियरच्या स्कूटर बंद होवून त्याजागी नवीन स्कूटर आल्या. हा बदल सर्वांनी स्वीकारला. त्याचप्रमाणे मिच्युअल फंड हे नवीन काळाचे गुंतवणुकीचे साधन आहे. जेवढ्या लवकर आपण ते स्वीकारू तेवढा आपला फायदा जास्त होईल.
आज मिच्युअल फंडांबद्दल माहिती अभावी, ऐकीव भीतीपोटी अनेकजण या आजच्या काळातील योग्य अशा साधनाकडे दुर्लक्ष करतात. आपण ही या साधनाची माहिती माहीतगार माणसाकडून करून घ्या. मिच्युअल फंड वितरक हा एम्फी (AMFI) संस्थेशी संलग्न असतो व एम्फी सेबी (SEBI) ची अखत्यारीत काम करते. म्हणजेच आपण पूर्णपणे सुरक्षित माध्यमातून गुंतवणुक करतो. येथे आधीच सांगितले जाते की “परताव्याची हमी नाही व गुंतवणुक ही बाजार जोखीमच्या अधीन आहे.”
असे असून देखील गेली ३० वर्षाहून अधिक काळ हे साधन अनेकजण वापरत आहेत व त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आपणही या साधनाचा योग्य वापर करून आपली आर्थिक प्रगती करून घेऊ व आर्थिक स्थैर्य प्राप्त करू.
अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळ पाहा
म्युच्युअल फंड्स म्हणजे काय? | म्युच्युअल फंड्स कसे कार्य करतात, व्याख्या
उद्यम,
उद्धव तुळशीबागवाले.
फोन: ८४४ ८४४ ०७३४, ०२०२४२२०७९९
Email: mutualfunds@udyaminvestments.in
Website: udyaminvestments.com
अस्वीकरण:
म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखीमीच्या अधीन आहेत, योजनेसंबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचावेत.
Was this article helpful?
That’s Great!
Thank you for your feedback
Sorry! We couldn't be helpful
Thank you for your feedback
Feedback sent
We appreciate your effort and will try to fix the article