म्युच्युअल फंड योजना प्रकार ((types of schemes in mutual fund)

Created by Uddhav Tulshibagwale, Modified on Wed, 16 Mar, 2022 at 7:47 PM by Uddhav Tulshibagwale

म्युच्युअल फंड

म्युच्युअल फंड हे सर्व साधारणपणे 3 प्रकारचे असतात. 

  • कायम चालू असणारे ओपन एंडेड फंड  (open ended fund)

  • ठरविक काळाकरिता मर्यादित क्लोज एंडेड फंड (close ended fund)

  • शेअर बाजारात उपलब्ध असणारे एकशेनज ट्रेडेड फंड   (exchange traded fund)

 

  • कायम चालू असणारे ओपन एंडेड फंड  (open ended fund) – म्युच्युअल फंडात या

प्रकारचे फंड अधिक आहेत. नावाप्रमाणे ह्या फंडात आपण केव्हाही कितीही रक्कम गुंतवू अथवा काढू शकतो. हे फंड कुठे गुंतवणुक करणार आहेत त्याचा तपशील आधीच जाहीर केलेला असतो. गुंतवणुक उद्दिष्टा (investment objectives) वरून आपल्याला त्यातील जोखीम शोधता येते, तसेच तो फंड हा आपल्या गुंतवणुक उद्दिष्टासाठी उपयोगी आहे किंवा नाही हे ही कळून येते. 

पैसे गुंतविणे अथवा पैसे काढून घेणे ही सर्व व्यवहार ही यूनिट मार्फत होतात. पैसे गुंतविल्यावर त्या दिवशीच्या निव्वळ मालमत्ता मूल्यानुसार  (nav) आपल्याला युनिट्स दिली जातात. पैसे काढून घेताना आपल्याकडची युनिट्स परत घेतली जातात. पैसे गुंतविताना युनिटसाठी कोणताही अधिक भार  (entry load) घेतला जात नाही. पैसे काढताना कदाचित भार (exit load) पडु शकतो. परंतु ठराविक मुदतीनंतर हा भार शून्य टक्के असतो, म्हणजेच काही भार पडत नाही. दोन लाख रूपयांपर्यंत गुंतवणुक केल्यास आपल्याला अर्ज भरलेल्या दिवशाची एनेवि नुसार युनिट्स दिली जातात.  गुंतवणुक रुपये दोन लाख अथवा जास्त असल्यास ज्या दिवशी अकाऊंट मधून पैसे जातात त्या दिवशीची एनेविने आपल्याला युनिट्स मिळतात.या योजना रोखे निगडीत (debt) व समभाग निगडीत (equity) अथवा दोन्ही एकत्र (hybrid) अशा प्रकारच्या असतात. या योजनांमध्ये आपण कितीही काळाकरिता म्हणजे अगदी सात दिवस ते कैक वर्षे, गुंतवणुक करू शकतो.आपल्या गुंतवणुक अवधी नुसार योग्य योजना निवडणे ही महत्वाचे. चुकीची योजना निवडणे अथवा ठरविलेल्या मुदती पूर्वी पैसे काढणे यामुळे नुकसान होऊ शकते. त्यामुळ माहीतगार असलेल्या व्यक्ति मार्फतच गुंतवणुक करावी. 

  • ठरविक काळाकरिता मर्यादित क्लोज एंडेड फंड (close ended fund) – सदर योजना

या काही ठरविक काळामध्येच पैसे गुंतविता येतात, तसेच या योजनांचा कालावधी देखील ठरलेला असतो. सुरवतीच्या काळात पैसे गुंतविल्यानंतर येथे परत पैसे गुंतविता येत नाहीत. 

तसेच मुदतीपूर्वी काढताही येत नाहीत. सहसा या योजना शेअर बाजारात नोंदलेल्या असतात पण फारसे व्यवहार होत नाहीत. थोडक्यात पैसे गुंतविल्यानंतर गुंतवणूकदार काहीच करू शकत नाही. तसेच मध्येच गरज पडल्यास पैसेही काढता येत नाहीत. येथे पैसे गुंतविताना असेच पैसे गुंतवावेत की जे आपणास लागणार नाहीत, तसेच या गुंतवणुकीतून फायदा होईलच असे नाही. या योजना निवडताना अतिशय काळजी घ्यावी. जशी सध्या बाजारात गुंतवणुक करण्यास निवडलेली योजना योग्य आहेका? त्यात किती जोखीम आहे? वगैरे. कारण एकदा गुंतवणुक झाली की मुदत पूर्ण झाल्याशिवाय काहीच करता येत नाही. ओपन एंडेड फंडणप्रमाणे या योजनाही  रोखे निगडीत (debt) वा  समभाग निगडीत (equity) अथवा दोन्ही एकत्र (hybrid) अशा प्रकारच्या असतात.

  • शेअर बाजारात उपलब्ध असणारे एकशेनज ट्रेडेड फंड    (exchange traded fund) –

या योजना एखादा ठराविक पोर्टफोलियो तयार करतात ज्यात बदल केला जात नाही. योजना सुरु करताना जे काही पैसे गोळा केले जातात त्यांना युनिट्स दिली जातात व पुढील सर्व व्यवहार ही शेअर बाजारात करावे लागतात. याच्या पोर्टफोलियो मध्ये फारसे कधीही योग्य कारणाशिवाय बदल केले जात नाहीत. तसेच येथे गुंतवणुक करण्यासाठी डीमॅट खाते आवश्यक असते. तसेच युनिट्स ही खरेदी, विक्री करण्यासाठी ब्रोकरेज ही द्यावे लागते. भारतामध्ये म्युच्युअल फंडतील गुंतवणुकीसाठी हा प्रकार अजून फारसा वापरला जात नाही. 

थोडक्यात म्युच्युअल फंडात गुंतवणुकीसाठी प्रामुख्याने ३ प्रकार उपलब्ध आहेत. आपण आपल्या गरजेनुसार जोखीम लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडणे. 

हे लक्षात ठेवा –

  1. गुंतवणुक करण्यापूर्वी आपण गुंतवणुक कशासाठी करत आहोत ही ठरवा 

  2. योजना निवडताना आपल्या गुंतवणुक मुदतीनुसार योग्य योजना निवडा 

  3. योजनेतील जोखमीची पूर्ण माहीत करून घ्या. 

हे टाळा –

  1. फक्त उच्च परतावा (high returns) पाहून गुंतवणुक करणे 

  2. मुदातिपूर्वीच योजना बदलणे 

म्युच्युअल फंड ही आजच्या काळाची गुंतवणुकीची गरज आहे मात्र योग्य मार्गदर्शन आवश्यक आहे. आपल्या सल्लागारशी संपर्क करून आजच म्युच्युअल फंडात गुंतवणुक सुरु करा.

काळानुसार बदलत राहणे यानेच आपण पुढे जाऊ शकतो.

म्युचुअल फंडात केलेली गुंतवणूक हि बाजाराच्या अधीन असते, गुंतवणूक करण्यापूर्वी संबधित योजनेचे माहिती पत्रक वाचून व समजून घेऊन गुंतवणूक करा.

उद्यम,

उद्धव  तुळशीबागवाले. 

फोन: ८४४ ८४४ ०७३४, ०२०२४२२०७९९ 

 

 

 

 

 

 

 

 

Was this article helpful?

That’s Great!

Thank you for your feedback

Sorry! We couldn't be helpful

Thank you for your feedback

Let us know how can we improve this article!

Select at least one of the reasons
CAPTCHA verification is required.

Feedback sent

We appreciate your effort and will try to fix the article