म्युच्युअल फंड
मागील भागात आपण म्युच्युअल फंड म्हणजे काय ते पाहिले. आता आपण म्युच्युअल फंडात गुंतवणुक कशी
होते, आपल्या गुंतवणुकीची आजची किंमत कशी काढता येते हे पाहू.
म्युच्युअल फंड हे वेगवेगळ्या योजनांमार्फत लोकांकडून पैसे जमा करतात. गुंतवणुक केल्यानंतर प्रत्येक
गुंतवणूकदाराला युनिटस दिले जातात. प्रत्येक योजनेचे गुंतवणुक उद्दिष्ट हे आधीच जाहीर केलेले असते. जमा
केलेले पैसे हे निर्देशित केलेल्या माध्यमांमध्ये गुंतविले जातात. सदर गुंतवणुक ही बाजारात(stock
exchange) केली असल्याने त्या गुंतवणुकीचे रोज मूल्यांकन केले जाते. व दर युनिटची किंमत (nav)
काढली जाते. आपल्याकडे असलेले युनिटस गुणिले युनिटची किंमत ही आपल्या गुंतावणुकीची आजची किंमत
असते.
उदाहरणार्थ –
समजा एखाद्या योजनेत १००० लोकांनी प्रत्येकी रुपये १ लाख गुंतविले म्हणजे योजनेअंतर्गत रुपये १० कोटी
जमा झाले (१००० x १०००००, गुंतवणूकदार गुणिले प्रत्येकी गुंतविलेली रक्कम). युनिटची सुरवातीची किंमत
रुपये १० म्हणजे एकूण १ कोटी युनिटस झाली. (१०००००००० ÷ १०, योजनेअंतर्गत पूर्ण जमा रक्कम भागिले
युनिटची किंमत)
म्हणजेच प्रत्येक गुंतवणूकदाराची गुंतवणुक ही झाली १०००० युनिटस (गुंतवणुक भागिले दर युनिटची किंमत)
व गुंतावणुकीची किंमत झाली रुपये १ लाख (यूनिट गुणिले युनिटची किंमत).
काही दिवसांनी योजनेतील पूर्ण गुंतवणुकीचे बाजारमुल्य झाले रुपये १२ कोटी. म्हणजे दर युनिटची किंमत
झाली रुपये १२ (१२००००००० x १०००००००, बाजारमुल्य भागिले युनिटस)
प्रत्येक गुंतवणूकदाराची आजची किंमत रुपये १२०००० (एक लाख वीस हजार).
दर युनिटची किंमत ही रोज प्रसारित केली जाते. म्युचुयल फंडामध्ये रोज गुंतवणुक करता येते अथवा पैसे
काढता येतात. सर्व व्यवहार हे युनिटच्या किमतीशी निगडीत असतात. पैसे गुंतविताना गुंतवणूकदाराला युनिटस
दिले जातात, पैसे काढताना युनिटस परत घेतले जातात.
पैसे कितीही गुंतविता येतात, तसेच कितीही काढता येतात.
तसेच पैसे केंव्हाही गुंतवता अथवा काढता येतात.
खालील तक्ता पहा -
दिनांक | व्यवहार | रक्कम (रु) | युनिट दर (रु) | मिळालेले/काढलेले युनिटस | उर्वरित युनिटस | व्यवहारानंतरचे गुंतवणुक मूल्य(रु) |
१-१-२०१८ | पैसे गुंतविले | १००००० | १० | १००००.००० | १०००० | १,००,००० |
१-६-२०१८ | पैसे काढले | १५००० | १२ | १२५०.००० | ८७५०.००० | १,०५,००० |
१-१०-२०१८ | पैसे गुंतविले | २५००० | १३ | १९२३.०७६ | १०६७३.०७६ | १,३८,७५० |
१-१०-२०१९ | - | - | १५ | - | १०६७३.०७६ | १,६०,०९६ |
(
(वरील आकडे हे केवळ उदाहरण कळण्यासाठीचे आहेत. हे कुठलाही परतावा निर्देशित करीत नाहीत)
म्युच्युअल फंड हे बँक अकाऊंट सारखे आहे. जेथे आपण केंव्हाही पैसे काढू अथवा घालू शकता. तसेच सर्व
व्यवहार हा पारदर्शी असतो आपल्याला किती पैसे मिळाले? युनिटचा दर काय होता? ह्याचे आपल्याला स्टेटमेंट
येते. सर्वात महत्वाचे म्हणजे पैसे काढण्यासाठी कोणताही त्रास हॉट नाही आपण नेट वरून व्यवहार करू
शकता. तसेक पैसे अकाऊंटला जमा होत असल्याने चेक मिळायला त्रास होणे आदि गोष्टी रहात नाहीत.
येथे पैसे दोघांच्या नावे गुंतविता येतात व एकाच्या सहीने व्यवहार करता येतात. तसेच म्युच्युअल फंड
अकाऊंटला नामांकन (nomination) ही करता येते.
आपली म्युच्युअल फंडात आधीची गुंतवणुक असेल त्याबद्दल आपला सल्लागार माहिती देतच असेल. काही
कारणाने आपण माहिती जाणून घेऊ शकत नसाल तर माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधू शकता.
आपली म्युच्युअल फंडात गुंतवणुक नसेल तर माहिती घेऊन आजच गुंतवणुक सुरु करा मदतीला आपला
सल्लागार आहेच, नसेल तर आमच्याशी संपर्क सध्या.
म्युचुअल फंडात केलेली गुंतवणूक हि बाजाराच्या अधीन असते, गुंतवणूक करण्यापूर्वी संबधित योजनेचे माहिती
पत्रक वाचून व समजून घेऊन गुंतवणूक करा.
उद्यम,
उद्धव तुळशीबागवाले.
ऍम्फी रजिस्टर्ड म्युच्युअल फंड वितरक
फोन: ८४४ ८४४ ०७३४, ०२०२४२२०७९९
Was this article helpful?
That’s Great!
Thank you for your feedback
Sorry! We couldn't be helpful
Thank you for your feedback
Feedback sent
We appreciate your effort and will try to fix the article